अमृता देशमुखचा भाऊ अभिषेक देशमुख सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. अभिषेक सध्या आई कुठे काय करते मालिकेत अभिनय करत आहे.
अमृता-प्रसाद लग्नबंधात अडकले : मराठी चित्रपटातील आणि टेलिव्हिजन वरचा प्रसिद्ध अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कपल आहे. या दोघांनी मित्र – मैत्रीण आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत काल थाटामाटात एकमेकांशी लग्न केलं. दोघांच्या लग्नाला अनेक मराठी कलाकार उपस्थित होते. अमृता देशमुखचा भाऊ अभिषेक देशमुख सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. अभिषेक सध्या आई कुठे काय करते मालिकेत अभिनय करत आहे. नुकतीच बहिणीची पाठवणी करताना अभिषेकने सोशल मीडियावर खास पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिषेक देशमुखने सोशल मीडियावर अमृता – प्रसादच्या लग्नसोहळ्यातले फोटो पोस्ट केलेत. या फोटोत अभिषेक बहिणीच्या मागे उभा असलेला दिसतो.
अभिषेक देशमुखने शेअर केलेल्या फोटो खाली लिहिले आहे की, “अमृता..खुप खुप आनंद,प्रेम आणि शुभेच्छा! तुम्हा दोघांना सदिच्छा आणि आशिर्वाद,” अशी पोस्ट करत अभिषेकने अमृताला शुभेच्छा दिल्यात.प्रसाद – अमृताच्या लग्नाला अनेक मराठी कलाकारांची उपस्थिती दर्शवली. या दोघांच्या लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांच्या लग्नाला मराठी कलाकारांनी उपस्थिती दर्शवली. दोघांचे अनेक मित्र इंडस्ट्रीत आहेत. त्यामुळे दोघांच्या लग्नाला नम्रता संभेराव, ओंकार राऊत, सिद्धार्थ खिरीड, आशुतोष गोखले, प्रार्थना बेहेरे हे कलाकार उपस्थित होते.
या सगळ्या कलाकारांनी अमृता – प्रसादच्या लग्नात धम्माल केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रसाद – अमृताच्या हळद – मेहंदी – संगीत अशा अनेक विधींमध्ये हे सर्व कलाकार उपस्थित होते. प्रसाद जवादे – अमृता देशमुख हे बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी होते. या शोमध्ये प्रसाद – अमृतामध्ये चांगली मैत्री झाली. दोघांमध्ये अनेक वाद – विवादही झाले. शोनंतर मात्र दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि अचानक दोघांनी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अखेर आज प्रसाद – अमृताने एकमेकांशी लग्न करुन सहजीवनाची सुरुवात केली आहे.