
सगळं काही सुरू असताना यामीने आपला मोर्चा बॉलिवूडच्या दिशेने वळवला. २०१२मध्ये यामी गौतम हिला अभिनेता आयुष्मान खुराणा याच्यासोबत ‘विक्की डोनर’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा हा चित्रपट कमी बजेटचा असला तरी तुफान गाजला होता. या नंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. यामी गौतम हिने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत ‘टोटल स्यापा’, ‘अॅक्शन जॅक्सन’, ‘बदलापुर’, ‘काबिल’, ‘दसवीं’, ‘उरी’ आणि ‘बाला’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०२१मध्ये यामीने दिग्दर्शक-निर्माता आदित्य धर याच्यासोबत लग्नगाठ बांधली.